गूगलने यंदाच्या वर्षीची म्हणजे 2019ची सर्वाधिक सर्च करण्यात आलेल्या सिलेब्रिटीजची यादी जाहीर केली आहे. गतवर्षी या यादीत साउथची स्टार प्रिया प्रकाश वॉरियर सर्वाधिक सर्च करण्यात आली होती. यंदाच्या वर्षी इंटरनेट सेंसेशन ठरलेल्या रानू मंडलने बाजी मारली आहे. रानू मंडलसाठी हे वर्ष एखाद्या स्वप्नाप्रमाणे ठरले आणि तिने खुपच प्रसिद्धी मिळविली.
गूगलने सर्वाधिक सर्च केलेल्या यादीत अभिनंदन वर्धमान हा पहिल्या स्थानावर राहिला आहे. तर लता मंगेशकर आणि युवराज सिंह हे अनुक्रमे दुस-या आणि तिस-या क्रमांकावर आहेत. तर रानू मंडल ही सातव्या स्थानावर आहे. तिने “स्टूडेंट ऑफ द इयर-2’ची ग्लॅमरस अभिनेत्री तारा सुतारिया पिछाडीवर टाकले आहे. एवढेच नव्हे तर या यादित “बिग बॉस 13’मधील सर्वात आवडता कंटेस्टेंट सिद्धार्थ शुक्लानेही स्थान मिळविले आहे.
दरम्यान, पश्चिम बंगालमधील राणाघाट रेल्वे स्टेशनवर लता मंगेशकरचे “एक प्यार का नगमा है’ हे प्रसिद्ध गाणे गातानाचा रानू मंडलचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. यानंतर प्रसिद्धिच्या झोतात आलेल्या रानू मंडलला थेट बॉलिवुडमध्ये गाणे गाण्याची संधी मिळाली. ही संधी हिमेश रेशमिया यांनी आपल्या चित्रपटातून तिला दिली होती.