पुणे – ऑल इंडिया जेम्स अँड ज्वेलरी कौन्सिल तर्फे आयोजित केलेल्या सर्वोत्तम इअररिंग्ज् स्पर्धेमध्ये पुण्यातील रांका ज्वेलर्सने डिझाईन केलेली इअररिंग्ज सर्वोत्कृष्ट ठरली.
ऑल इंडिया जेम्स अँड ज्वेलरी कौन्सिल ही भारतामधील सर्वात मोठी ज्वेलरी इंडस्ट्रीची शिखर संस्था असून त्यांनी आयोजित केलेल्या या स्पर्धेमध्ये भारतामधील 300 सराफ सुवर्णकारांनी सहभाग घेतला होता.
या स्पर्धेत सर्वांना मागे टाकत रांका समूहाच्या डिझाईनने ज्युरींची मने जिंकली. 20 ऑक्टोबर गोवा येथे आयोजित केलेल्या पुरस्कार वितरण सोहळ्यामध्ये प्रसिध्द अभिनेत्री सोफिया चौधरी यांच्या हस्ते रांका ज्वेलर्स समूहाला बेस्ट इअररिंग्ज् ऑफ द ईयर या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. याप्रसंगी चेतन तारेश्वर, श्रीपाल ढोलकीया आदी उपस्थित होते.
रांका ज्वेलर्सचे फतेचंद रांका, वस्तुपाल रांका व श्लोक रांका यांनी हा पुरस्कार स्वीकारला. पुरस्कारप्राप्त या इअररिंगचे वैशिष्टय म्हणजे वर्तुळाकार सोन्याच्या रिंगमध्ये घडविलेली हिऱ्याची आगळीवेगळी डिझाईन. डिझाईनसाठी रांका ज्वेलर्सचे वास्तुपाल रांका व शीतल रांका यांनी परिश्रम घेतले.