जयपूर : पंजाबने राजस्थानचा १० गडी राखून पराभव करत रणजी ट्राफी स्पर्धेत ‘अ’ गटामध्ये आपल्या अभियानाची जोरदार सुरूवात केली आहे. या विजयासह पंजाबने आपल्या खात्यात ७ गुण जमा केले आहे. मनदीप सिंग सामन्याचा मानकारी ठरला.
Punjab Won by 10 Wicket(s) #RAJvPUN @paytm #RanjiTrophy Scorecard:https://t.co/Mp7tHLj7ER
— BCCI Domestic (@BCCIdomestic) December 12, 2019
राजस्थानने पहिल्या डावात सर्वबाद २५७ धावा केल्या होत्या. पंजाबकडून पहिल्या डावात गोलंदाजीत सिध्दार्थ कौलने ४ तर बलतेज सिंह आणि सनवीर सिंहने प्रत्येकी २ गडी बाद केले.
End Innings: Team Rajasthan – 257/10 in 79.4 overs (A V Choudhary 4 off 17, S K K Ahmed 1 off 5) #RAJvPUN @paytm #RanjiTrophy
— BCCI Domestic (@BCCIdomestic) December 10, 2019
प्रत्युत्तरात पंजाबने आपल्या पहिल्या डावात ३५८ धावा करत १०१ धावांची महत्वपूर्ण आघाडी घेतली. पंजाबकडून फलंदाजीत पहिल्या डावात मनदीप सिंगने सर्वाधिक १२२ धावांची खेळी केली.
त्यानंतर राजस्थानने दुस-या डावात १६८ धावा करत पंजाबसमोर विजयासाठी ६८ धावांचे लक्ष्य ठेवलं. पंजाबकडून दुस-या डावात सनवीरने ३ तर बलतेज सिंह, मयंक मार्केंडेय आणि गुरकित सिंहने प्रत्येकी २ गडी बाद केले.
End Innings: Team Rajasthan – 168/10 in 74.5 overs (S F Khan 25 off 63, A V Choudhary 0 off 5) #RAJvPUN @paytm #RanjiTrophy
— BCCI Domestic (@BCCIdomestic) December 12, 2019
पंजाबने विजयासाठीचे ६८ धावांचे लक्ष्य एकही गडी न गमावता ११.४ षटकांत सहज गाठलं. पंजाबकडून शुबमन गिलने नाबाद ३६ आणि सनवीर सिंहने नाबाद २६ धावांची खेळी करत विजय संपादित केला.