#RanjiTrophy : सामना सुरू होण्यापूर्वी मैदानावर साप आल्याने खेळाडूंची झाली पळापळ

विजयवाडा : भारतीय क्रिकेटमधील यंदाच्या रणजी करंडक स्पर्धेस आजपासून (सोमवारी) सुरूवात झाली आहे. यामध्ये एकूण ३८ संघ सहभागी झाले आहेत. दरम्यान, आज रणजी करंडकमध्ये विदर्भ आणि आंध्र यांच्यातील सामना सुरू होण्यापूर्वी एक विचित्र घटना घडली.

विदर्भ आणि आंध्र सामना सुरू होण्यापूर्वी एक साप मैैदानात घुसल्याने सामना सुरू होण्यास काही वेळ विलंब झाला. विदर्भाचा कर्णधार फैज फजल यानं नाणेफेक जिंकत प्रथम क्षेत्ररक्षण स्विकारलं होते. त्यानंतर खेळाडू क्षेत्ररक्षणासाठी मैदानावर आले असता त्यांना एक साप नजरेस पडला आणि त्यामुळं सामना सुरू होण्यास विलंब झाला.

बीसीसीआय डोमेस्टिक या घटनेचा १३ सेंकदाचा व्हिडीओ ट्विटरवर शेअर केला आहे. तसेच ट्विट करताना म्हटलं आहे की ” सापमुळं खेळ थांबला आहे. सामना सुरू होण्यापूर्वी मैदानावर एक पाहुणा आला आहे”.

Leave A Reply

Your email address will not be published.