अगरताला : अंकित बावणे आणि स्वप्निल गुगळे यांच्या अर्धशतकी खेळीच्या जोरावर महाराष्ट्राने रणजी करंडक क्रिकेट स्पर्धेत त्रिपुराचा ५ गडी राखून पराभव करत विजय नोंदविला आहे. या विजयासह महाराष्ट्राने आपल्या खात्यात ६ गुण जमा केले आहेत. अंकित बावणे याला सामनावीर म्हणून गौरविण्यात आले.
Maharashtra Won by 5 Wicket(s) #TPAvMAH @paytm #RanjiTrophy Scorecard:https://t.co/pAEA58W0hr
— BCCI Domestic (@BCCIdomestic) January 30, 2020
महाराष्ट्राने नाणेफेक जिंकत प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला होता. त्यानंतर महाराष्ट्राने प्रथम फलंदाजीस उतरलेल्या त्रिपुराचा पहिला डाव १२१ धावांत गुंडाळला होता.
Innings break: Tripura – 121/10 in 37.6 overs (Rana Datta 21 off 52, A S Sarkar 1 off 2) #TPAvMAH @paytm #RanjiTrophy
— BCCI Domestic (@BCCIdomestic) January 27, 2020
त्यानंतर प्रत्युत्तर देताना महाराष्ट्राने पहिल्या डावात २०८ धावांपर्यत मजल मारत त्रिपुरावर पहिल्या डावानंतर ८७ धावांची आघाडी घेतली होती.
Innings break: Maharashtra – 208/10 in 64.2 overs (V V More 78 off 153, MD Ingale 0 off 4) #TPAvMAH @paytm #RanjiTrophy
— BCCI Domestic (@BCCIdomestic) January 28, 2020
त्यानंतर त्रिपुराने दुस-या डावात सर्वबाद २९० धावांपर्यत मजल मारत महाराष्ट्रासमोर विजयासाठी २०४ धावांचे लक्ष्य ठेवले होते.
End Innings: Tripura – 290/10 in 89.6 overs (A S Sarkar 2 off 22, Rana Datta 9 off 20) #TPAvMAH @paytm #RanjiTrophy
— BCCI Domestic (@BCCIdomestic) January 29, 2020
त्यानंतर दुस-या डावात फलंदाजी करताना महाराष्ट्राने विजयासाठीचे २०४ धावांचे लक्ष्य ५५.५ षटकांत ५ विकेटच्या मोबदल्यात २०५ धावा करत पूर्ण केले आणि विजय साकारला.
WICKET! Over: 53.3 A N Kazi 31(28) ct R A Dey b D T Bhattacharjee, Maharashtra 195/5 #TPAvMAH @paytm #RanjiTrophy
— BCCI Domestic (@BCCIdomestic) January 30, 2020
संक्षिप्त धावफलक : त्रिपुरा : पहिला डाव – सर्वबाद १२१( मूरा सिंह २४, राना दत्ता २१, मनोज इंगळे ६-३४) दुसरा डाव- ९० षटकांत सर्वबाद २९०(पल्लब दास ७७, मिलिंदकुमार ६७, आशय पालकर ५-६२, मुकेश चौधरी ३-७७) वि. महाराष्ट्र : पहिला डाव – सर्वबाद २०८ (विशांत मोरे ७८, अंकित बावणे ६२, मुरा सिंह ३-४६, सरकार ३-५९) आणि दुसरा डाव – ५५.५ षटकांत ५ बाद २०५ ( अंकित बावणे ६१, स्वप्निल गुगळे ५७, अझीम काझी ३१, राना दत्ता ३-३८).