#RanjiTrophy : हरियाणाचा महाराष्ट्रावर १ डाव ६८ धावांनी विजय

रोहतक : हरियाणाच्या गोलंदाजांच्या अचूक मा-यासमोर महाराष्ट्राच्या फलंदाजांनी शरणागती पत्करली. त्यामुळे यंदाच्या रणजी मोसमातील पहिल्याच क्रिकेट लढतीत महाराष्ट्राला पराभवाला सामोरे जावं लागलं आहे. हरियाणाने महाराष्ट्राचा १ डाव आणि ६८ धावांनी पराभव करत विजय संपादित केला आहे. या विजयासह हरियाणाच्या खात्यात ७ गुण जमा झाले आहे.

हरियाणाने पहिल्या डावात ४०१ धावा केल्या होत्या. ४०१ धावांना उत्तर देताना महाराष्ट्राचा पहिला डाव २४७ धावांवर आटोपला. त्यामुळे महाराष्ट्राला फाॅलोआॅनच्या नामुष्कीचा सामना करावा लागला.

आपला दुसरा डाव सुरू केल्यानंतर देखील हरयाणाच्या गोलंदाजीसमोर पुन्हा एकदा महाराष्ट्राचे फलंदाज ढेपाळले आणि दुस-या डावात महाराष्ट्राचा संघ २९ षटकात अवघ्या ८६ धावांवर संपुष्टात आला. दुस-या डावात महाराष्ट्राकडून नौशाद शेखने सर्वाधिक २७ धावा केल्या.

हरियाणाकडून गोलंदाजीत हर्षल पटेल याने पहिल्या डावात ७० धावा देत ४ आणि दुस-या डावात २२ धावा देत ५ गडी बाद करत संघाच्या विजयात मोलाचा वाटा उचलला. आशिष हुड्डाने देखील पहिल्या डावात ३ आणि दुस-या डावात ४ गडी बाद करत महत्वपूर्ण कामगिरी बजावली.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.