#RanjiTrophy : ‘रोहिला-चौहान’ची शतके; दिवसअखेर हरियाणा ३ बाद २७९

रोहतक : शुभम रोहिला आणि शिवम चौहान यांच्या २२१ धावांच्या भागिदारीच्या जोरावर हरियाणाने पहिल्या दिवसअखेर ८४ षटकात ३ बाद २७९ धावसंख्येपर्यत मजल मारली आहे. आजपासून रणजी करंडक स्पर्धेस सुरूवात झाली असून रोहतक येथे हरियाणा विरूध्द महाराष्ट्र #HARvMAH अशी लढत सुरू आहे.

हरियाणाने नाणेफेक जिकंत प्रथम फलंदाजी स्विकारली. त्यानंतर त्याचे दोन फलंदाज झटपट बाद झाले. अंकितकुमार १४ तर चैतन्य बिश्नोई ०१ धाव काढून माघारी परतले, तेव्हा हरियाणाची २ बाद २४ अशी अवस्था झाली होती. त्यानंतर शुभम रोहिला आणि शिवम चौहान यांनी डाव सावरत तिस-या विकेटसाठी २२१ धावा जोडल्या. प्रदीप दाढेने शिवम चौहानला ११७ धावावर बाद करत ही जोडी फोडली.

महाराष्ट्राकडून प्रदीप दाढे, समद फल्ला आणि अनुपम संकलेचा यांनी प्रत्येकी १ गडी बाद केला. पहिल्या दिवसाचा खेळ थांबला तेव्हा शुभम रोहिला नाबाद ११७ आणि हिमांशू राणा नाबाद २० धावांवर खेळत होते.

Leave A Reply

Your email address will not be published.