डिंडीगूल : फिरकीपटू के. गौतम याने दुस-या डावात घेतलेल्या ८ बळींच्या जोरावर कर्नाटकने तामिळनाडूचा २६ धावांनी पराभव केला आहे. या विजयासह कर्नाटक संघाने आपल्या खात्यात ६ गुण जमा केले आहेत.
Karnataka Won by 26 Run(s) #TNvKAR @paytm #RanjiTrophy Scorecard:https://t.co/H8P5vBsBn8
— BCCI Domestic (@BCCIdomestic) December 12, 2019
कर्नाटकने प्रथम फलंदाजी करताना पहिल्या डावात सर्वबाद ३३६ धावा केल्या होत्या. यामध्ये देवदत्त पडिक्कलने सर्वाधिक ७८ धावा केल्या. तामिळकडून गोलंदाजीत विग्नेश व सिध्दार्थने प्रत्येकी २ गडी तर आर आश्विनने ४ गडी बाद केले.
त्यानंतर कर्नाटकने के. गौतमच्या ६ आणि रोनित मोरेच्या २ बळीच्या जोरावर तामिळनाडूला पहिल्या डावात ३०७ वर रोखत २९ धावांची घेतली. तामिळनाडूकडून फलंदाजीत दिनेश कार्तिकने शतक झळकावत ११३ धावांची खेळी केली.
कर्नाटकने २९ धावांची आघाडी घेत दुस-या डावात सर्वबाद १५१ धावा करत तामिळनाडूला विजयासाठी १८१ धावांचे आव्हान दिल. कर्नाटककडून फलंदाजीत देवदत्तने ३९ तर के. गौतमने २२ धावा केल्या. तामिळनाडूकडून गोलंदाजीत आश्विनने ४ तर विग्नेशने ३ गडी बाद केले.
Gowtham K 8 WICKETS! (30.3-11-60-8), Tamil Nadu 154/10 #TNvKAR @paytm #RanjiTrophy
— BCCI Domestic (@BCCIdomestic) December 12, 2019
विजयासाठीचे १८१ धावांचे आव्हान तामिळनाडू सहज पूर्ण करेल अस वाटत होतं, पण दुस-या डावात के गौतम याने गोलंदाजी करताना ८ बळी घेत तामिळनाडू संघाची हवाच काढत त्यांना १५४ धावांवरच गारद करत संघास विजय मिळवून दिला.