सोलापूर – ग्लोबल टीचर पुरस्कार मिळवणारे पहिले भारतीय शिक्षक रणजितसिंह डिसले गुरुजींना आणखी एक स्कॉलरशिप मिळाली आहे. अमेरिकन सरकारकडून दिली जाणारी ”फुलब्राईट स्कॉलरशिप” डिसले गुरुजींना देण्यात आली आहे. याबाबत स्वत: रणजितसिंह डिसले गुरुजींनी ट्वीट करून माहिती दिली आहे.
आनंदाची बातमी
अमेरिकन सरकारकडून दिली जाणारी फुलब्राईट स्कॉलरशिप मला मिळाली आहे.
Super excited to share – I have been selected for the 2021-22 Fulbright DAI sponsored by U.S.— Dr.Ranjitsinh (@ranjitdisale) December 4, 2021
रणजितसिंह डिसले गुरुजींनी अमेरिकन सरकारकडून देण्यात आलेल्या स्कॉलरशिपबाबत माहिती दिली आहे. ”आनंदाची बातमी अमेरिकन सरकारकडून दिली जाणारी फुलब्राईट स्कॉलरशिप मला मिळाली आहे.” असे ट्वीट डिसले गुरुजींनी केले आहे.
ग्लोबल टीचर पुरस्कार मिळाल्यानंतर डिसले गुरुजींची जागतिक बँकेने सल्लागार म्हणून नियुक्ती केली आहे. त्यानंतर आता 2021-22 ची अमेरिकन सरकारकडून दिली जाणारी ”फुलब्राईट स्कॉलरशिप” डिसले गुरुजींना देण्यात आली आहे.