रणजीपटू विवेक यादवचे करोनामुळे निधन

जयपूर – राजस्थानचा फिरकीपटू आणि रणजी ट्रॉफी विजेत्या संघाचा खेळाडू विवेक यादवचे करोनामुळे निधन झाले. त्याच्या पश्‍चात पत्नी आणि एक मुलगी असा परिवार आहे.

36 वर्षीय विवेक यादववर कर्करोगाचे उपचार सुरू होते आणि किमोथेरपीसाठी तो रुग्णालयात गेला असता, त्याची करोना चाचणी करण्यात आली. याचा अहवाल पॉझिटिव्ह आला. यानंतर रुग्णालयात त्याने अखेरचा श्‍वास घेतला.

भारताचा माजी क्रिकेटपटू आकाश चोपडाने निधनानंतर ट्‌विटर पोस्टद्वारे शोक व्यक्‍त केला आहे. राजस्थान रणजी प्लेअर आणि प्रिय मित्र … विवेक यादव आता आपल्यात नाही. त्याच्या आत्म्याला शांती मिळो. कुटुंबासमवेत विचार आणि प्रार्थना, असे ट्‌विट आकाश चोपडाने केले.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.