सोलापूर – मूळचे महाराष्ट्रातील सोलापूरचे मात्र, रेल्वेचे प्रतिनिधित्व करणारे रणजी क्रिकेटपटू उमेश दास्ताने यांचे रविवारी रात्री करोनामुळे निधन झाले. ते 64 वर्षांचे होते. त्यांच्या मागे आई, पत्नी, दोन मुली, जावई व नातवंडे असा परिवार आहे.
रेल्वेकडून त्यांनी 16 रणजी सामने खेळताना 1 शतक व 4 अर्धशतकांच्या मदतीने 747 धावा केल्या होत्या. तसेच 13 गडी बाद केले होते. 1978-79 ते 1984-85 या मोसमांत त्यांनी देशांतर्गत क्रिकेटमध्ये सरस कामगिरी केली होती. ते मध्य रेल्वेतून तिकीट तपासनीस म्हणून निवृत्त झाले होते. त्यांना अस्वस्थ वाटू लागल्याने रुग्णलयात दाखल करण्यात आले होते. तेव्हा त्यांना करोनाची बाधा झाल्याचे स्पष्ट झाले होते.