नवनाथ बोरकर
सामना पाहण्यासाठी शरद पवार यांच्या पत्नी प्रतिभाताई पवार यांचीही उपस्थिती
डोर्लेवाडी : भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने परवानगी दिल्यानंतर बारामतीत डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्टेडियमवर आज पहिला रणजी सामना सुरू झालाय. आजपासून बारामतीत 15 फेब्रुवारी या कालावधीत महाराष्ट्र विरुद्ध उत्तराखंड यांच्यातील सामना खेळला जात आहे. या रणजी सामन्याचे आज 12 फेब्रुवारी रोजी माझी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार आणि बीसीसीआयचे मान्यवर यांच्या उपस्थितीत सामना सुरू झालाय. शरद पवार यांच्या पत्नी प्रतिभाताई पवार ह्या देखील सामना पाहण्यासाठी उपस्थित आहेत.
एटी कॉलेज आणि अन्य ग्राउंडवर तासनतास रणजी सामने पाहण्यासाठी मी गेलेलो आहे त्यावेळेस स्टेडियम भरलेलं असायचे रणजी म्हणजे उद्याच्या क्रिकेटची पुढची पायरी आहे रणजी च्या खेळाडूने कर्तुत्व दाखवलेल्या खेळाडूला पुढच्या टीममध्ये संधी मिळायची मला आनंद या गोष्टीचा आहे की रणजी आता पुणे मुंबई या ठिकाणी सीमित राहिली नसून रणजी आता बारामतीत देखील खेळली जात आहे.
मी बीसीसीआय आणि महाराष्ट्र क्रिकेट असोशियन यांचे मी मनापासून आभार मानतो की त्यांनी या ग्राउंडची निवड केली बीसीसीआयने सुरुवात केली नसती तर आज बारामती मध्ये हा रणजी चा सामना खेळला गेला नसता आज या रणजी सामन्याला सुरुवात झाल्याने हा देशांमध्ये इतिहास होणार आहे आणि इथून पुढे आता सतत या मैदानावर रणजी क्रिकेट सामने होणार असल्याचे बीसीसीआयचे माजी अध्यक्ष शरद पवार यांनी सांगितले.