माढ्यातून रणजितसिंह नाईक निंबाळकरांना भाजपची उमेदवारी

सातारा – भाजपचा माढ्याचा तिढा अखेर सुटला आहे. फलटणच्या रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या उमेदवारीची घोषणा करण्यात आली आहे. माढ्यात आता भाजपचे रणजितसिंह नाईक निंबाळकर विरुद्ध राष्ट्रवादी काँग्रेसचे संजय शिंदे असा सामना रंगणार आहे.

लोकसभा निवडणूकीसाठी भाजपने आज उमेदवारांची बारावी यादी जाहीर केली. या यादीमध्ये देशभरातील 11 उमेदवारांचा समावेश आहे. त्यामध्ये रणजितसिंह नाईक निंबाळकर हे महाराष्ट्रातील एकमेव नाव आहे.

दरम्यान, काही दिवसापूर्वी सातारा जिल्हा कॉंग्रेसचे अध्यक्ष रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश केला होता. भाजप प्रवेशानंतरच माढा लोकसभा मतदारसंघातून  लोकसभेची उमेदवारी रणजितिसंह नाईक निंबाळकरांना देण्यात येणार अशी चर्चा होती.

Leave A Reply

Your email address will not be published.