सोलापूर – माढा लोकसभा मतदारसंघातील भाजपचे उमेदवार रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांच्या कुटुंबियांकडे 127 कोटी 51 लाख 60 हजार 578 इतकी स्थावर आणि जंगम मालमत्ता असल्याची माहिती त्यांनी उमेदवारी अर्ज दाखल करताना दिलेल्या शपथपत्रात नमूद केली आहे.
नाईक-निंबाळकर यांची 25 बॅंक खाती, एलआयसी आणि शेअर्समध्ये गुंतवणूक आहे. त्यांच्या आणि पत्नीच्या नावे अनुक्रमे 71 आणि 46 तोळे असे एकूण 117 तोळे सोने असल्याचे दाखविले आहे. रणजितसिंह यांच्याकडे 84 कोटी सहा लाख 82 हजार 656 रुपये आणि पत्नी जिजामाला यांच्याकडे 10 कोटी 12 लाख 41 हजार 584 अशी एकूण 94 कोटी 19 लाख चोवीस हजार 240 रुपयांची स्थावर मालमत्ता आहे. याशिवाय 12 कोटी 65 लाख 58 हजार 566 रुपये इतकी जंगम मालमत्ता असल्याचे दाखविण्यात आले आहे.