रांजणगाव गणपती भाद्रपद महोत्सव याञा या वर्षी साजरी करु नये, जिल्हाधिकाऱ्यांचं देवस्थानाला पत्र

रांजणगाव – रांजणगाव गणपती येथील भाद्रपद महोत्सव याञा या वर्षी साजरी करु नये असे पञ जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी रांजणगाव गणपती देवस्थानला दिले. कोरोना विषाणू चा प्रादुर्भाव रोखण्यासाठी रांजणगाव येथील मंदिर गणपती मंदिर गेल्या अनेक दिवसापासून बंद आहे मात्र याञा भरणार की नाही याबाबत अनेक ग्रामस्थांमध्ये व भाविंकामध्ये संभ्रम निर्माण झाला होता. या याञे बाबत देवस्थानच्या विश्वस्तांनी जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांच्याशी पञ व्यवहार करुन याञा भरवण्यास परवानगी मागितली होती.

माञ रांजणगाव येथील कोरोना रुग्णांची संख्या २५ वर पोहोचली होती. यातील १३ !रुग्ण बरे झाले असून १२ जणांवर उपचार चालू आहेत. याचा विचार करुन जिल्हाधिकारी आयुष्य प्रसाद यांनी ३१ आँगस्ट पर्यंत कोणतेही धार्मिक कार्यक्रम साजरे करु नये असे पञ दिले आहे. भाद्रपद महोत्सवाला या ठिकाणी दरवर्षी चार ते पाच लाख भाविक दर्शनासाठी येत असतात. त्यामुळे रांजणगाव येथील कोरोना रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेऊन गर्दी टाळण्यासाठी ३१ आँगस्ट पर्यंत कोणत्याही धार्मिक विधीला परवानगी नसल्याचे पञात नमुद करण्यात आले आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.