रांजणगाव गणपती(प्रतिनिधी) : मागील आठवड्यात कोरोना पाँझिटिव्ह असलेल्या इसमाच्या संर्पकातील आणखी तीन जण कोरोना पाँझिटिव्ह झाले असल्याची माहिती वैद्यकीय अधिकारी डाँ. स्नेहल घोडेवार यांनी दिली. त्यामुळे रांजणगाव येथील कोरोनाची तुटलेली साखळी पुन्हा वाढल्यामुळे रांजणगावकरांच्या चिंतेत भर पडली आहे.
रांजणगाव गणपती येथे सुरवातीला पुण्याला गेलेला एक जण कोरोना पाँझिटिव्ह सापडला होता. त्याच्या संर्पकातील पत्नी व मिञ ही त्यामुळे पाँझिटिव्ह सापडले होते. हे सर्व जण ठणठणीत बरे होऊन घरी आले आहेत. त्यामुळे कोरोनाची साखळी तुटली होती. माञ मागील आठवड्यात रांजणगाव येथील एक जण पुन्हा कोरोना पाँझिटिव्ह सापडल्यामुळे व त्याच्या संर्पकातील तीन जण आज कोरोना पाँझिटिव्ह आले असल्याचे वैद्यकीय अधिकारी डाँ. स्नेहल घोडेवार यांनी सांगितले.
दरम्यान, रांजणगाव येथील कोरोना बाधित रुग्णांची संख्या पाच वर पोहोचल्यामुळे नागरिकांनी शासनाच्या सर्व आदेशांचे काटेकोरपणे पालन करावे. असे आवाहन सरपंच सर्जेराव खेडकर यांनी केले आहे.