रांजणगाव गणपती(प्रतिनिधी) : येथील एका नामांकित कंपनीत कामाला असलेल्या एका युवकास कोरोना रोगाची लागण झाली असल्याची माहिती रांजणगाव प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डाॅ. महेश सातव यांनी दिली.
सदर युवक औद्योगिक वसाहतीमध्ये नामांकित कंपनीत कामास आहे. त्याला अचानक ञास होऊ लागल्यामुळे काल त्याच्या घशाचे नमुने(स्वॅब) तपासणी करता घेण्यात आले होते. त्यानंतर आज त्याचा अहवाल पाँझिटिव्ह आला आहे, असे वैद्यकिय अधिकाऱ्यांनी सांगितले आहे.
त्यानंतर खबरदारी म्हणून सदर युवकाच्या संर्पकांत आलेल्या कामगारांचे आणि त्यांच्या कुटूंबातील सदस्यांचे व सोबतच्या मिञांचे घशाचे स्वॅब ऊद्या तपासण्यात येणार असून त्यांना होम क्वारटांईन करण्यात येणार असल्याचे डाॅ. सातव यांनी सांगितले.