रांजण खळग्यांचे पर्यटकांना आकर्षण

बेल्हे – मंगरूळ (ता. जुन्नर) गावच्या शिवारात कुकडी नदीच्या पात्रात रांजण खळगे हे वैशिष्टयपूर्ण कुंड आहेत. आणखी एक विस्मयकारी बाब म्हणजे सध्या भीषण दुष्काळ परिस्थितीत निसर्गाचा आविष्कार पर्यटकांना आकर्षित करत आहे. या कुंडातील पाणी दुष्काळात सुद्धा अटत नाही.

जुन्नर तालुक्‍यात असलेल्या मंगरूळ शिवारात कुकडी नदीपात्रात निसर्गाचा चमत्कार पाहायला मिळत आहे. “रांजण खळगी’ म्हणजे नदीपात्रात असलेल्या खडकात पाण्याच्या प्रवाहाने तयार झालेले खड्डे. मंगरूळ-पारगाव रस्त्यावर कुकडी नदीच्या पुलाजवळ कुकडी नदीच्या पात्रात हा आविष्कार पाहावयास मिळत आहे.

भौगोलिक बदलांचा अभ्यास करण्यासाठीही अभ्यासक इथं यावेत, असे येथील ग्रामस्थांना अपेक्षा आहे. सध्या हे खड्डे पर्यटकांनाही आकर्षित करीत आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.