राणी मुखर्जी बनणार “फॅशन क्वीन ऑफ फुरसतगंज’

मुंबई – राणी मुखर्जीने आतापर्यंत जेवढे रोल केले आहेत, ते सगळेच प्रेक्षकांच्या चांगले लक्षात राहिले आहेत. त्यातल्या त्यात “बंटी और बबली’मधील बबलीचा रोल तिच्या गाजलेल्या रोलपैकी एक होता. 

आता “बंटी और बबली 2′ मधून राणी पुन्हा एकदा प्रेक्षकांसमोर येते आहे. मात्र, यावेळी तिचा अवतार पहिल्यापेक्षा खूपच वेगळा असणार आहे. यावेळी ती “फॅशन क्वीन ऑफ फुरसतगंज’

म्हणून दिसणार आहे. आता “बंटी और बबली’च्या दुसऱ्या भागात राणी ऊर्फ बबली ही बाकीच्या सर्व उद्योगांमधून रिटायर्ड झालेली आणि केवळ कुटुंबावरच लक्ष केंद्रित केलेली गृहिणी म्हणून दिसणार आहे. 

यावेळी तिच्याबरोबर बंटी म्हणून अभिषेक बच्चन ऐवजी सैफ अली खान दिसणार आहे. राणी मुखर्जी आता फुरसतगंजमधील एक नावाजलेली फॅशन डिझायनर बनलेली आहे. हे एक खेडेगाव आहे. तेथे राहून ती कंटाळलेली आहे. तिला आयुष्यात काही तरी थ्रिल हवे आहे. 

हा रोल पहिल्या बबलीपेक्षा खूपच आकर्षक असणार आहे. राणीच्या या नवीन रोलमध्ये राणीचा लूक देखील एखाद्या फॅशन क्वीनला साजेसा आहे. 19 नोव्हेंबरला हा सिनेमा रिलीज होणार आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.