राणी मुखर्जीचा “मर्दानी 2′ लवकरच होणार प्रदर्शित

बॉलिवूडची मर्दानी गर्ल अभिनेत्री राणी मुखर्जी हिचा मर्दानी अंदाज प्रेक्षकांना प्रचंड भावला होता. तिच्या या चित्रपटाचा दुसरा भाग रसिकांच्या भेटीला येणार हे काही महिन्यांपूर्वीच निर्मात्यांनी घोषित केले होते. याबाबतीत ताजी बातमी अशी आहे की, “मर्दानी 2′ या चित्रपटाची रिलीज डेट नुकतीच जाहीर केली आहे.

यशराज फिल्म्स यांच्यातर्फे याबाबत इन्स्टाग्रामवरील अधिकृत पेजवर घोषणा केली असून राणी मुखर्जीचा “मर्दानी 2′ चित्रपट 13 डिसेंबर रोजी प्रदर्शित होणार असल्याची माहिती दिली आहे. यावर्षीच्या सुरूवातीलाच चित्रपटाची शूटिंग सुरू झाली होती. चित्रपटाचा पहिला भाग प्रदीप सरकार यांनी दिग्दर्शित केला होता तर दुसरा भाग गोपी पुथरान हे दिग्दर्शित करतील.

“मर्दानी 2’ची निर्मिती राणी मुखर्जीचा पती आदित्य चोप्रा करणार आहे. राणी मुखर्जीने “मर्दानी’ चित्रपटात शिवानी शिवाजी रॉय हिची भूमिका साकारली होती. आपल्या मुलीला एका रॅकेटच्या तावडीतून सोडवण्यासाठी तीने केली धडपड पहिल्या चित्रपटात दाखवली गेली होती.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here