मुंबई – बॉलीवूडची मर्दानी म्हणजेच अभिनेत्री ‘राणी मुखर्जी’ सध्या आनंदात आहे. त्याला कारणही तसच आहे. राणीच्या ‘हिचकी’ या चित्रपटाला प्रेक्षकांचा चांगलाच प्रतिसाद मिळाला होता. तिच्या या चित्रपटासाठी तिला ‘सर्वात प्रभावशाली व्यक्तिमत्वाचा’ पुरस्कार मिळाला आहे. साऊथ-ईस्ट आशियामध्ये आयोजित केलेल्या एका अवॉर्ड शोमध्ये तिला या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.
निर्देशक सिद्धार्थ मल्होत्रा यांच्या या चित्रपटात राणीने मुख्य भूमिका साकारली होती. या चित्रपटासाठी तिने बरीच मेहनत केली होती. या चित्रपटात तिने केलेल्या उत्तम अभिनयासाठीच तिला सन्मानित करण्यात आले आहे. देश-विदेशामध्ये या चित्रपटाने चांगली कमाई केली होती.
बऱ्याच वर्षांनी अभिनेत्री राणी मुखर्जीने ‘हिचकी’ या चित्रपटातून कमबॅक केल होत. तिच्या अभिनयाचं प्रेक्षक- समीक्षकांकडून कौतुकदेखील करण्यात आलं. सिद्धार्थ पी मल्होत्रा दिग्दर्शित ‘हिचकी’ या चित्रपटात आपल्यातील एका व्यंगाला आपली सर्वांत मोठी ताकद बनवणाऱ्या महिलेची कथा अधोरेखित करण्यात आली आहे.