वाघोली : केसनंद रोडवर कचऱ्याचा ढिगारा साफ करून काढली रांगोळी काढण्यात आली. वाघोली-केसनंद रोडवरील पीएमपीएमएल बस स्टॉपजवळ दुकानदार, नागरिकांकडून कचरा टाकला जात असल्याने रस्त्याच्या दोन्ही बाजूला कचऱ्याचे ढीग साचले होते.
गुरुवारी (दि.१६) वाघोली ग्रामपंचायतीच्या वतीने विशेष स्वच्छता मोहीम राबवून येथील कचरा हलविण्यात आला आहे. याठिकाणी स्वच्छ वाघोली, सुंदर वाघोली अक्षरासह रांगोळी काढण्यात आली असून नागरिकांनी येथे कचरा टाकू नये अन्यथा ग्रामपंचायतीच्या वतीने दंडात्मक कारवाई केली जाईल असा फलक देखील लावण्यात आला आहे.