दक्षिणेकडची ऍक्ट्रेस कीर्ति सुरेश आणि साऊथचा सुपरस्टार नितीन यांच्या “रंग दे’चा ट्रेलर रिलीज झाला आहे. एका खास कार्यक्रमात हे ट्रेलर रिलीज केले गेले. मात्र त्यापूर्वीच इंटरनेटवर हे ट्रेलर व्हायरल व्हायला लागले आहे. “रंग दे’ हा रोमॅंटिक आणि कॉमेडीचा तडका असलेला सिनेमा असणर आहे.
बालपणापासूनचे मित्र असलेल्या नितीन आनि कीर्ति यांच्यातील नातेसंबंधांवरील हा सिनेमा आहे. कीर्ति हुशार आणि जिनिअस असते, तर नितीनला आपले शिक्षणही व्यवस्थित पूर्ण करता येत नसते. दोघांच्या कुटुंबांमध्येही मोठा संघर्ष असतो. हे मतभेदच दोघांमधील संघर्षाला मोठे कारण बनलेले असतात.
“रंग दे’ 28 मार्चला थिएटरमध्ये रिलीज होणार आहे. सध्या या सिनेमाच्या संदर्भत काही हॅशटॅग ट्रेन्ड सुरू झाले आहेत. त्यावरूनच या सिनेमाची प्रेक्षक किती उत्सुकतेने वाट बघत आहेत, हे लक्षात येते. दक्षिणात्य सिनेमांमध्ये नेहमीची जी मारधाड बघायला मिळते, ती “रंग दे’मध्ये नसल्याने याची ओळख वेगळी असाल्याचे लक्षात येते आहे.