चिपळूण – केंद्रिय मंत्री नारायण राणे यांचा अधिकाऱ्यांचा झापण्याचा व्हीडिओ व्हायरल झाला होता. राणे अधिकाऱ्यांना झापत असताना विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर मध्ये बोलायला लागले यावेळी राणे यांनी ‘थांब रे मध्ये बोलू नको…’ म्हणत दरेकरांना गप्प केलं. राणेनी दरेकरांना सर्वासमोर गप्प केल्याने सर्वच अवाक झाल्याचे बघायला मिळाले आहे.
या व्हिडिओवरून सध्या व्हिडियो सोशल मीडियावर भाजप नेत्यांवर चांगलीच टीका होत आहे. यावर आता विधानपरिषद विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी प्रतिक्रिया दिली आहे. “लोकांचा आक्रोश पाहून नारायण राणे संतापले होते. लोकांच्या संतप्त भावना पाहून त्यांनी ती चिड व्यक्त केली,” असं प्रवीण दरेकरांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना म्हटलं आहे.
दरम्यान, केंद्रिय मंत्री नारायण राणे, विधानसभेचे विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस व विधानपरिषदेचे विरोधीपक्ष नेते प्रवीण दरेकर यांनी चिपळूणच्या पूरग्रस्त भागाचा दौरा केला. यावेळी नारायण राणे यांनी अधिकाऱ्यांना सुनावले असल्याचा एक व्हीडिओ समाज माध्यमांवर व्हायरल झाला होता. दरम्यान राणे अधिकाऱ्यांना झापत असताना प्रविण दरेकरांनी मध्ये बोलण्याचा प्रयत्न त्यावेळी राणे यांनी ‘थांब रे मध्ये बोलू नको…’ म्हणत दरेकरांना सर्वासमोर गप्प केले होत.