रणदीप-इलियानाची जोडी झळकणार

अभिनेता रणदीप हुड्डा आणि अभिनेत्री इलियाना डिक्रूझची जोडी “अनफेयर ऍण्ड लव्हली’मध्ये झळकणार आहे. या चित्रपटाची नुकतीच घोषणा करण्यात आली आहे. हा एक कॉमेडी चित्रपट असून यात भारतात गोऱ्या रंगाबाबत असलेला जुनून दाखविण्यात येणार आहे.

हरियाणाच्या पार्श्‍वभूमीवर या चित्रपटात एका सावळा रंगाच्या मुलीची कथा असून जी वर्णभेदामुळे पीडित असते. या चित्रपटात इलियाना डिक्रूझ लव्हलीची भूमिका साकारताना दिसणार आहे. विशेष म्हणजे अभिनेता रणदीप हुड्डा हा पहिल्यांदाच विनोदी चित्रपटात काम करणार आहे.

या चित्रपटातून बलविंदरसिंह जांजुआ हे दिग्दर्शनात पदार्पण करीत आहेत. हा चित्रपट निर्णायक वेळी येत आहे, जेथे एकीकडे महिलांना सबलीकरणासाठी प्रोत्साहित केले जात आहे आणि दुसरीकडे गोऱ्या रंगाला महत्त्व देणाऱ्या वाईट प्रथांविरुद्ध दृढपणे उभे राहण्याची गरज आहे.

या चित्रपटाची पटकथा बलविंदर सिंह जांजुआ, रूपिंदर चहल आणि अनिल रोहन यांनी लिहिली आहेत. तसेच अमित त्रिवेदी यांनी संगीत दिले असून, इर्शाद कामिल यांनी गीत लिहिले आहेत.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.