ख्रिस हेम्सवर्थच्या नेटफ्लिक्स क्राइम-थ्रिलर “एक्सट्रॅक्शन’ या चित्रपटाद्वारे धमाकेदार डिजिटल डेब्यूनंतर रणजीत हुड्डा पुन्हा एकदा ओटीटीच्या प्लॅटफॉर्मवर झळकणार आहे. जिओ स्टुडिओच्या बॅनरखाली रणदीपने थ्रीलर कॉप शो साइन केला असून यात तो उत्तर प्रदेशच्या सुपर कॉप अविनाश मिश्राची भूमिका साकारताना दिसणार आहे. या थ्रिलर कॉप ड्रामाचे दिग्दर्शन नीरज पाठक करणार आहेत.
जिओ स्टुडिओने ट्विटर हॅंडलवर पोस्ट केली की, आम्हाला ही घोषणा करताना खूप आनंद होत आहे, रणदीप हुड्डा हा इन्स्पेक्टर अविनाशच्या रूपात वेब सीरिजमध्ये पदार्पण करणार आहे. ही कॉप थ्रिलर “यूपी’ सुपर कॉप अविनाश मिश्रा यांच्या जीवनावर आधारित आहे. या मालिकेचे शूटिंग डिसेंबर 2020 पासून सुरू होईल.
आपल्या भूमिकेविषयी रणदीप हुड्डा म्हणाला, “मी माझ्या प्रत्येक पात्राबरोबर नवीन आव्हानात्मक भूमिका साकारण्यास उत्सुक आहे आणि इन्स्पेक्टर अविनाश मला तसे करण्याची उत्तम संधी देत आहे. सुपर कॉपच्या सत्य घटनांवर आधारित ही एक अतिशय प्रेरणादायक आणि मनोरंजक भूमिका आहे. या शोसाठी नीरजच्या दूरदृष्टीवर माझा विश्वास आहे आणि मी या शूटिंगला सुरुवात करण्यास उत्सुक आहे.