मुंबई – लव रंजनचा बहुप्रतीक्षित रोमँटिक कॉमेडी चित्रपट ‘तू झूठी मैं मक्कार’ हा चित्रपट अखेर प्रेक्षसकांच्या भेटीस आला आहे. उत्तम डायलॉग्जसह रणबीर आणि श्रद्धा कपूरची रॉकिंग केमिस्ट्री, तसेच कडक लोकेशन्सवर शूट करून रिलेशनशिपमधील अनोखी गुंतागुंत या चित्रपटातून सिनेरसिकांना अनुभवता आली आहे.
‘तू झूठी मैं मक्कार’हा चित्रपट 2023 मधील पहिला रोमँटिक चित्रपट असल्यामुळे तरुणाईला याची चांगलीच भुरळ पडली असून, चित्रपट बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई करत आहे. मिळालेल्या माहितीनुसार चित्रपटाने 11 दिवसांत 100 कोटींच्या क्लबमध्ये प्रवेश केला आहे. यासह हा चित्रपट 100 कोटींचा टप्पा पार करणारा रणबीर कपूरच्या करिअरमधील सहावा चित्रपट ठरला आहे.
याआधी 2022 मध्ये रणबीर कपूरचा ‘ब्रह्मास्त्र’ हा चित्रपट प्रदर्शित झाला होता, ज्याने 200 कोटींहून अधिक कमाई केली होती. याशिवाय रणबीरच्या ‘बर्फी, संजू, ये जवानी है दिवानी आणि ये दिल है मुश्किल’ या चित्रपटांनीही 100 कोटींहून अधिक कमाई केली आहे. दरम्यान, ‘तू झूठी मैं मक्कार’ या चित्रपटातून रणबीर आणि श्रद्धा कपूर पहिल्यांदाच प्रेक्षकांसमोर एकत्र आले आहेत.