रणबीर कपूरचा व्हिडिओ व्हायरल

बॉलिवुड अभिनेता रणबीर कपूर आपल्या आगामी चित्रपटापेक्षा अफेयरमुळेच जास्त चर्चेत येत आहे. काही दिवसांपूर्वी तो आलियासोबत सुट्‌टी घालविण्यासाठी केनियाला गेला होता. यावेळी काढलेले अनेक फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. आता रणबीरचा आणखी एक व्हिडिओ सोशल मीडियावर खूपच व्हायरल झाला असून चाहत्यांना तो खूपच आवडला आहे.

रणबीर कपूरला नुकतेच मुंबई विमानतळावर स्पॉट करण्यात आले होते. नेहमीप्रमाणे यावेळीही त्याच्यासोबत अनेक पपराजी उपस्थित होते. यातील एक पपराजी कपिल करांडे याचा वाढदिवस होता आणि त्याच्या बर्थडे केकही आणला होता. याप्रसंगी फोटोग्राफर्सने विनंती केल्याने रणबीर थोडयावेळ तेथे थांबला आणि कपिलसोबतत बर्थडे केक कापून त्याला शुभेच्छाही दिल्या.

दरम्यान, वर्कफ्रंटबाबत सांगायचे झाल्यास रणबीर लवकरच आलियासोबत “ब्रह्मास्त्र’च्या पुढील शेड्यूलच्या शूटिंगसाठी पुढील महिन्यात मनालीला जाणार आहे. दुसरीकडे आलिया सध्या आपल्या आगामी “सडक-2′ चित्रपटाचे म्हैसूर येथे शूटिंग करत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.