सोशल मीडिया आज सर्वांच्या जीवनातील एक अविभाज्य भाग बनला आहे. सेलिब्रिटीजही याच्या माध्यमातून आपल्या चाहत्यांशी जोडले गेले आहेत. अशातही बॉलीवूडमधील असे काही कलाकार आहेत, जे सोशल मीडियापासून दूर आहेत. यापैकी एक म्हणजे रणबीर कपूर.
परंतु त्याचे एक सीक्रेट अकाउंट आहे. ज्या माध्यमातून तो अन्य सेलेब्सवर नजर ठेवून आहे. यात त्याची एक्स गर्लफ्रेंड्स दीपिका पदुकोण आणि कतरिना कैफ यांचाही समावेश आहे.
याबाबत एका मुलाखतीत त्याने स्वतः खुलासा केला होता की, तो सोशल मीडियातून अन्य कलाकारांवर लक्ष ठेवून आहे. जेव्हा रणबीरला विचारण्यात आले की, तू सोशल मीडियावर ऍक्टिव्ह का नाहीस, यावर त्याने एक गमतीशीर उदाहरण दिले.
View this post on Instagram
तो म्हणाला, सोशल मीडियावर काही चांगल्या आणि वाईट या दोन्ही गोष्टी आहेत आणि या दोन्ही गोष्टींचे साइड इफेक्ट्सही आहेत. यासाठी मी या सर्वांपासून दूर आहे. परंतु सोशल मीडियावर काही चांगले लोकही आहेत. ज्यांच्यावर मी सतत नजर ठेवून आहे. यात कतरिना, दीपिका, आलिया आणि रणवीर यासारखे लोक आहेत.
दरम्यान, अभिनेता रणबीर कपूरचा काल 38वा बर्थ डे साजरा केला. यानिमित्त त्याची बहीण रिद्धिमाने त्याला खास विश केले आहे. तसेच अनेक कलाकारांनी त्याला शुभेच्छा दिल्या आहेत.