मुंबई – अभिनेता रणबीर कपूर नुकताच ब्रम्हास्त्र या बिग बजेट चित्रपटात दिसला. ब्रम्हास्त्रला संमिश्र प्रतिसाद मिळाल्यानंतर आता रणबीरचा आगामी चित्रपट कोणता असेल याची सर्वांना उत्सुकता लागली होती. यापूर्वी रणबीरने केलेले तब्बल तीनही सिनेमे बिग बजेट होते. त्यामुळे त्याचा आगामी चित्रपट कसा असेल याकडे सर्वांचं लक्ष लागलं होत. आता रणबीरच्या आगामी चित्रपटाच्या सेटवरून काही फोटो व्हायरल झाले आहेत.
वाढलेले केस आणि दाढी त्यासोबतच चेहऱ्यावर झालेल्या जखमा आणि रक्ताने माखलेला शर्ट असा आगळावेगळा अवतार या फोटोंमध्ये पाहायला मिळत आहे. इंटेन्स लूक असलेल्या या सिनेमाचं नाव अॅनिमलअसल्याचे समजते. तर चाहत्यांना रणबीरचा हा लूक चांगलाच आवडताना दिसत आहे.एकाने हा चित्रपट कधी रिलीज होणार असा सवाल विचारला आहे तर दुसऱ्याने हे काहीतरी नवीन दिसतंय अशी कमेंट केली आहे.
#RanbirKapoor new look from #Animal pic.twitter.com/nbVSQr5g9u
— Indian Box Office (@box_oficeIndian) November 23, 2022
एका मुलाखतीत रणबीरने या सिनेबाबत बोलताना म्हंटल होत,हा सिनेमा कम्फर्ट झोन सोडून काम करायला लावणारा सिनेमा आहे. तसेच या सिनेमाची कथा ऐकल्यानंतर मला भीती वाटली होती असा खुलासा देखील रणबीरने यावेळी केला आहे. अॅनिमल हा सिनेमा संदीप रेड्डी वांगा हे दिग्दर्शित करणार आहेत. त्यांनी या आधी कबीर सिंह हा चित्रपट दिग्दर्शित केला होता.अॅनिमलमध्ये रणबीर सोबत अनिल कपूर आणि बॉबी देओल देखील झळकणार आहे.