मुंबई – बॉलीवूडमधील रॉकस्टार रणबीर कपूर आणि मिस्टर परफेक्शनिस्ट आमीर खान यांच्या चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. हे दोन स्टार कलाकार लवकरच एकत्रित काम करताना दिसणार आहे.
यापूर्वी आमीर खानच्या सुपरहिट “पीके’मध्ये रणबीर कपूरने कॅमियो भूमिका साकारली होती. आमिर आणि रणबीर यांना पुन्हा एकत्रित पाहण्यासाठी चाहत्यांना अनेक वर्षांपासून प्रतिक्षा आहे. ही प्रतिक्षा आता लवकरच संपणार आहे. हे दोघेजण एका रोमांचक प्रोजेक्टमध्ये स्क्रिन शेअर करताना दिसणार आहेत. या प्रोजेक्टची स्क्रिप्ट दोघांनाही आवडली आहे.
ही स्क्रिप्ट वाचल्यानंतर दोघांनीही काम करण्यास होणार दिला असल्याचे समजते. या चित्रपटाची निर्मिती स्वतः आमीर खान करणार असून पुढील वर्षी शूटिंगला सुरुवात होण्याची शक्यता आहे. दरम्यान, रणबीर कपूर आणि आमिर खान यांच्या चाहत्यांमधील उत्सुकता वाढली आहे. याबाबत सोशल मीडियावर जोरदार चर्चा आहे.