संदीप वंगासोबत काम करू इच्छितो रणबीर कपूर

बॉलिवुडमधील प्रसिद्ध दिग्दर्शक संदीप वंगा यांचा “कबीर सिंह’ हा शाहिद कपूरच्या कारकिर्दीतील आतापर्यतचा सर्वात हिट चित्रपट ठरला आहे. हा चित्रपट भलेही वादात राहिल, परंतु या चित्रपटाने बॉक्‍स ऑफिसवर तब्बल 275 कोटींहून अधिक कलेक्‍शन केले होते. यानंतर आता संदीपने आपल्या आगामी चित्रपटासाठी रणबीर कपूरशी संपर्क साधला आहे. परंतु, त्यांच्यासोबत काम करण्यासाठी रणबीरने एक अट ठेवली आहे.

रणबीर कपूरही संदीप यांच्यासोबत काम करू इच्छितो. पण तो त्यापूर्वी संपूर्ण स्क्रीनप्ले वाचणार असून त्यानंतर तो चित्रपटात काम करण्याचा निर्णय घेणार आहे. सध्या संदीप चित्रपटाची स्क्रिप्ट लिखित असून यासाठी आणखी 10-15 दिवसांचा वेळ लागणार आहे.

या चित्रपटाला भूषण कूमार प्रड्यूस करणार असून “डेविल’ असे चित्रपटाचे नाव असणार आहे. संदीप यांच्या चित्रपटात रणबीरला कास्ट करण्याबाबत भूषण म्हणाले होते की, आम्ही हा चित्रपट साकारत असून अद्याप कलाकार निश्‍चित करण्यात आलेले नाहीत. संदीप आताही स्क्रिप्टवरच काम करत आहेत. ते जेव्हा पूर्ण होईल, त्यानंतर अधिकृत घोषणा करण्यात येईल, असे त्यांनी सांगितले.

Leave A Reply

Your email address will not be published.