मुंबई : ज्येष्ठ अभिनेते ऋषी कपूर यांचे निधन झाले आहे. ऋषी कपूर यांना बुधवारी रात्री त्यांच्या कुटुंबियांनी एच एन रिलायन्स रुग्णालयात दाखल केले होते. त्यांचे भाऊ रणधीर कपूर यांनी सांगितले की, त्यांना श्वास घेण्यात अडचण येत होती. रात्री उशीरा त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. कँसरशी त्यांची झुंज सुरू होती. मात्र ही झुंज अपयशी ठरली आहे. मागच्या वर्षभरापासून ते न्यूयॉर्कमध्ये कॅन्सरवर उपचार घेत होते आणि काही महिन्यापूर्वीच ते भारतात परतले होते.
ऋषी कपूर आज आपल्यात नाहीत मात्र अनेक दशकांचं त्यांचं सिनेसृष्टीतील योगदान मात्र कायमचं अजरामर झालं. 2019 च्या अखेरीसच ऋषी कपूर कॅन्सरवर उपचार घेऊन भारतात परतले होते. ते एक असे अभिनेता होते. जे त्यांच्या कॅन्सर ट्रीटमेंट दरम्यान सुद्धा कामाबद्दल काळजी करत होते. याचा खुलासा त्यांच्या मुलानं म्हणजेच रणबीर कपूरनं स्वतः केला होता. एक अवॉर्ड फंक्शनमध्ये रणबीर म्हणला होता, ते ट्रीटमेंटवेळी नेहमी एकच गोष्ट विचारत असत की मी ठिक होऊन घरी जाईन ना? मला यानंतर कोणी काम देईल का? मला माझ्या प्रेक्षकांचं मनोरंजन करता येईल का?
View this post on Instagram
Your family is your whole world ❤️ so so many LOVES in these beautiful moments 🙏🤗🥰
दरम्यान, न्यूयॉर्कमध्ये उपचार घेत असताना अनेक बॉलिवूड कलाकारांनी तेथे जाऊन ऋषी कपूर यांची भेट घेतली होती. “कॅन्सर हे फक्त राशीचंच नाव असावं, हा आजार कोणालाही नसावा”, अशा शब्दांत पत्नी नीतू कपूर यांनी भावना व्यक्त केल्या होत्या.