रणबीर कपूर आणि दीपिका पादुकोणचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये हे दोघेजण एकत्र रॅम्पवर चालताना दिसत आहेत. हा व्हिडिओ कॉस्ट्यूम डिझायनर आणि स्टायलिस्ट मनीष मल्होत्रा यांनी शेअर केला आहे.
या व्हिडिओमध्ये रणबीर कपूर आणि दीपिका पादुकोण जेव्हा रॅम्पवर चालत असतात तेव्हा तिथे उपस्थित सर्वजण दोघांना चीयर करताना दिसतात. तथापि, हा व्हिडिओ जुना असून याबाबत मनीष मल्होत्राने व्हिडिओ शेअर करताना माहिती दिली आहे.
रणबीर कपूर आणि दीपिका पादुकोणचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात पाहिला जात आहे. हा व्हिडिओ आतापर्यंत सुमारे 2 लाख वेळा इंस्टाग्रामवर पाहिला गेला आहे. यावर चाहत्यांकडूनही अनेक प्रतिक्रिया येत आहेत. रणबीर-दीपिका यांची मैत्री एकेकाळी खूपच चर्चेत राहिली होती. तसेच दोघांनी अनेक चित्रपटात एकत्रीत काम केले आहे. ही जोडी खूपच हिट ठरली होती.
दरम्यान, रणबीर कपूर लवकरच “ब्रह्मास्त्र’ चित्रपटात दिसणार आहे. या चित्रपटात त्याच्यासोबत अभिनेत्री आलिया भट्ट झळकणार आहे. दुसरीकडे दीपिका पादुकोण “83′ या चित्रपटात पती रणवीर सिंगसोबत मुख्य नायिकेच्या भूमिकेत चाहत्यांच्या भेटीला येणार आहे.