Kartik Aaryan New Movie: अभिनेता रणबीर कपूर आणि दीपिका पादुकोण यांची प्रमुख भूमिका असलेला ‘ये जवानी है दीवानी’ हा चित्रपट काही दिवसांपूर्वीच री-रिलीज करण्यात आला होता. री-रिलीजनंतरही चाहत्यांकडून रणबीर आणि दीपिकाच्या केमिस्ट्रीला भरभरून प्रेम मिळाले. आता पुन्हा एकदा दोन्ही कलाकार मोठ्या पडद्यावर एकत्र काम करताना पाहायला मिळू शकतात. हे दोघेही कलाकार कार्तिन आर्यनच्या चित्रपटात कॅमियो करू शकतात.
कार्तिक आर्यनच्या ‘तू मेरी मै तेरा, मै तेरा तू मेरी’ या चित्रपटाची काही दिवसांपूर्वीच घोषणा करण्यात आली होती. कार्तिकच्या या चित्रपटामध्ये रणबीर आणि दीपिका ही लोकप्रिय जोडी एकत्र काम करताना चाहत्यांना पाहायला मिळू शकते.
केवळ हे दोघे कलाकाराच नाही तर ‘ये जवानी है दीवानी’ या चित्रपटातील आदित्य रॉय कपूर आणि कल्की कोचलिन हे देखील त्यांची भूमिका पुन्हा साकारणार आहेत. ‘ये जवानी है दीवानी’ चित्रपटातील कलाकारांना पुन्हा एकदा एकत्र पाहण्यास चाहते देखील उत्सुक आहेत. मात्र, चित्रपटाच्या निर्मात्यांकडून याबाबत कोणतीही अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही.
दरम्यान, कार्तिक आर्यनने काही दिवसांपूर्वीच ‘तू मेरी मै तेरा, मै तेरा तू मेरी’ या चित्रपटाची घोषणा केली. या चित्रपटासाठी कार्तिक आणि करण जोहर एकत्र येणार आहेत. दोस्ताना -2 या चित्रपटामुळे दोघांमध्ये मतभेद निर्माण झाले होते. मात्र, या चित्रपटाच्या निमित्ताने दोघेही एकत्र येणार आहेत. या चित्रपटाचे दिग्दर्शन समीर विध्वंस करणार आहेत. तर यामधील अभिनेत्रीच्या भूमिकेसाठी शर्वरी वाघचे नाव चर्चेत आहे. कार्तिकचा हा चित्रपट 2026 मध्ये प्रेक्षकांच्या भेटीला येईल.