रणबीर आणि आलिया काशी विश्‍वनाथ मंदिरात

रणबीर आणि आलिया भट सध्या बनारसमध्ये “ब्रम्हास्त्र 2’चे शुटिंग करत आहेत. याच व्यस्त वेळापत्रकातून वेळ काढून हे स्टार काशी विश्‍वनाथच्या मंदिरामध्ये दर्शनासाठी पोहोचले. मंदिरात पोहोचलल्याबरोबर त्यांच्या फॅन्सनी त्यांना घेरले. या फॅन्सबरोबर या जोडीने खूप फोटो काढले आणि सोशल मिडीयावर अपलोडदेखील केले. या अचानक मिळालेल्या अनुभवामुळे रणबीर-आलियाचे फॅन्स जाम खूष झाले.

काही दिवसांपूर्वी बनारसमध्येच एका सीनचे शुटिंग गंगा नदीच्या किनाऱ्यावर झाले होते. त्यावेळे या दोघांना बघण्यासाठी खूप गर्दी जमा झाली होती. सेटच्या आसपास जमलेली ही गर्दी आवरणे अवघड झाले होते. रणबीर आणि आलियाच्या रक्षणासाठी असलेल्या बाऊन्सर आणि काही लोकांमध्ये वादावादी झाले. प्रकरण भडकायला लागले. त्यामुळे काही दिवस रणबीर-आलियाला खुल्या वातावरणात येऊच दिले गेले नव्हते. पण काशी विश्‍वनाथाच्या मंदिरामध्ये येऊन या दोघांनी मस्त वेळ घालवला. बनारसमध्ये आणखी 20 दिवस ते शुटिंग करणार आहेत. “ब्रम्हास्त्र’च्या प्रॉडक्‍शनच्या बरोबर आता “ब्रम्हास्त्र 2′ चे शुटिंगही सुरू झाल्याने दोन्ही सिनेमे एक वर्षभराच्या अंतरानेच प्रदर्शित होणार आहेत.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.