रणबीर आणि आलियाचे लग्न डिसेंबरमध्ये

मुंबई : रणबीर कपूर आणि आलिया भट यांचे डेटिंग गेल्या 2 वर्षांपासून सुरू आहे. या दोन वर्षांच्या काळात या दोघांच्या लग्नाच्या संदर्भात अनेक अफवा पसरल्या. लग्न थोडे दिवस पुढे ढकलले, लग्नाचा मुहुर्त ठरला, ऋषी कपूर उपचारानंतर नक्की लग्न होणार इथपासून लग्न मोडले, अजून नक्की काही नाही इथपर्यंत बऱ्याच गोष्टी या अफवांमध्ये खपवल्या गेल्या. मात्र आता या दोघांच्या लग्नाचा थेट मुहुर्तच काढला गेला असल्याचे समजते आहे.

या वर्षी डिसेंबरमध्ये हा जोडीचे लग्न होणार असे अधिकृतपणे समजले आहे. या वर्शि 4डिसेंबरला ” ब्रम्हास्त्र’ रिलीज झाल्यावर या दोघांचे लग्न नक्की होणार असे समजले आहे. प्रत्यक्षात या दोघांच्या लग्नाची तयारीही सुरू झाली आहे. या लग्नानिमित्ताने होणाऱ्या विशेष समारंभासाठी वेळ काढून ठेवा, असे नातेवाईकांना आणि मित्र परिवाराला सांगण्यात आले आहे. आता हे जर खरे असेल तर “ब्रम्हास्त्र’च्या हिट पार्टीमध्येच लग्नाच्या तारखेची घोषणाही होण्याची शक्‍यता आहे. सध्या तरी रणबीर आणि आलिया दोघेही “ब्रम्हास्त्र’च्या कामात बिझी आहेत.

 

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.