मुंबई – अभिनेत्री ‘आलिया भट्ट’ आणि अभिनेता ‘रणबीर कपूर’ बॉलिवूडमधील लोकप्रिय जोडीपैकी एक आहे. गेल्या काही वर्षांपासून आलिया आणि रणबीर एकमेकांना डेट करत आहेत. त्यामुळे यांच्या लग्नाच्या चर्चाही होताता दिसून येत आहेत. दोघांचेही चाहते लग्न कथी करणार आहे? अशी सोशल मिडियावर विचारणा करत आहेत.
यातच आता ही लोकप्रिय जोडी याच महिन्यात लग्नबंधनात अडकणार आहेत. रणबीर त्याच्या बॅचलर पार्टीच्या तयारीला लागला असून त्याच्या बॅचलर पार्टीत सहभागी होणाऱ्या पाहुण्यांची यादीही समोर आली आहे. दोघेही त्यांचे वैयक्तिक आयुष्य लाइमलाइटपासून दूर ठेवतात. त्यामुळे या जोडप्याने त्यांचे लग्न जवळचे मित्र आणि कुटुंबीयांमध्ये करण्याचा निर्णय घेतला आहे.
पिंकविलाच्या वृत्तानुसार, रणबीर त्याच्या घरी बॅचलर पार्टी आयोजित करणारआहे. त्याच्या पार्टीला त्याचे जवळचे मित्र आणि इंडस्ट्रीतील बालपणीचे मित्र उपस्थित राहणार आहेत. या यादीत अर्जुन कपूर, आदित्य रॉय कपूर आणि अयान मुखर्जी यांच्या नावांचा समावेश आहे. हे तिघेही रणबीरच्या खूप जवळ आहेत.
तर आलिया आणि रणबीरचे लग्न मुंबईत पार पडणार आहे. रणबीरने स्वतः लग्नाचे ठिकाण, त्याचे वडिलोपार्जित घर ‘आरके हाऊस’ निश्चित केले आहे. रणबीर आई-वडील ऋषी कपूर आणि नीतू कपूर यांचा विवाह 20 जानेवारी 1980 रोजी आरके हाऊसमध्ये झाला होता. त्यामुळे रणबीरलाही त्याची प्रेयसी आलियासोबत चेंबूर येथील घरात लग्न करायचे आहे. या लग्नात 450 पाहुणे सहभागी होणार आहेत. 17 एप्रिलला लग्नाची तारीख निश्चित झाली आहे.