रणबीर-आलियाची लग्नपत्रिका व्हायरल; आलिया म्हणाली… 

रणबीर आणि आलिया भट लग्न करणार असा चर्चा आपण अनेक दिवसांपासून ऐकत आहोत. आता या चर्चांना अधिकृत दुजोरा मिळण्याची शक्यता आहे. या दोघांच्या लग्नाची पत्रिका सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल होत आहे. यामध्ये रणबीर-आलियाच्या लग्नाची तारीख आणि स्थळही देण्यात आले आहे.

सोशल मीडियावरील पत्रिकेनुसार, आलिया आणि रणबीर २२ जानेवारी २०२० मध्ये विवाहबंधनात अडकणार आहेत. त्यांचा विवाह उमेद पॅलेसमध्ये पार पडणार असून यावर नीतू कपूर आणि ऋषी कपूरचे नाव लिहिण्यात आले आहे. तसेच महेश भट्ट यांच्या जागेवर मुकेश भट्ट यांचे नाव लिहिण्यात आले आहे. आणि येथेच सर्वत मोठी चूक झाली असून ही पत्रिका पूर्णपणे फेक असल्याचे उघड झाले. आलियाला विवाहपत्रिकेबद्दल प्रश्न विचारला असता तिला हसू अनावर झाले आणि ती निघून गेली.

 दरम्यान, सोनम कपूरच्या लग्नापासून त्यांच्या अफेअरची खुली चर्चा सुरू आहे. मागून येऊन दीपिका आणि प्रियांका यांची लग्ने झालीसुद्धा. मात्र या दोघांच्या लग्नाचा विषय पुढे का सरकत नाही आहे, हा खराच एक प्रश्‍न आहे.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)