मुंबई : येस बॅंकेचे संस्थापक राणा कपुर यांची कन्या रोशनी कपुर हिला आज मुंबईच्या विमानतळावरून लंडनला जाण्यापासून रोखण्यात आले.
राणा कपुर यांना या बॅंकेच्या गैरव्यवहार प्रकरणात सध्या अटक करण्यात आली असून त्यांची चौकशी सुरू असल्याने त्यांच्या कन्येलाही विदेशात जाण्यापासून रोखण्यात आले आहे.
या प्रकरणाच्या तपासाच्या संबंधात राणा कपुर यांच्या कन्येचीही चौकशी केली जात असून तिच्याही संबंधीत मालमत्तांवर ईडीने छापे टाकले आहेत.
राणा कपुर यांच्याशी संबंधीत प्रकरणांतील एकूण रक्कम 4300 कोटी रूपये इतकी असल्याची माहिती ईडीच्या अधिकाऱ्यांनी दिली आहे.