राणा कपूर यांच्या कोठडीत वाढ

मुंबई – येस बॅंकेचे संस्थापक राणा कपूर यांच्या न्यायालयीन कोठडीत 2 एप्रिलपर्यंत वाढ करण्यात आली आहे. आज मुंबईतील विशेष न्यायालयाने कपूर यांच्या कोठडीत वाढ केली. दरम्यान, आज दुपारी जेट एअरवेजचे संस्थापक नरेश गोयल ईडीच्या कार्यालयात चौकशीसाठी हजर झाले.
येस बॅंक घोटाळ्या प्रकरणी ईडीने राणा कपूर यांची चौकशी करून त्यांना ताब्यात घेतलं होते. कपूर यांच्यावर मनी लॉंडरिंगचा गुन्हा दखल झाला आहे. मार्च रोजी कपूर यांना ईडीने ताब्यात घेतले. त्यानंतर मार्चपर्यंत ईडीच्या कोठडीत कपूर यांना ठेवण्यात आले.

येस बॅंक घोटाळ्या प्रकरणी ईडीने आता मोठ्या कर्जदारांनाही समन्स बजावली आहेत. गुरुवारी ईडीच्या अधिकाऱ्यांनी रिलायन्स समुहाचे चेअरमन अनिल अंबानी यांच्या अडचणी वाढण्याची शक्‍यता आहे. ईडीच्या मुंबई कार्यालयात अनिल अंबानी यांची तब्बल नऊ तास कसून चौकशी करण्यात आली होती. त्यानंतर त्यांना सोडण्यात आले.

येस बॅंकेचे माजी मुख्य कार्यकारी अधिकारी राणा कपूर यांची कोटींची अफरातफर केल्याप्रकरणी अंमलबजावणी संचालनालय म्हणजेच ईडीकडून चौकशी करण्यात येत आहे. आज दुपारी जेट एअरवेजचे संस्थापक नरेश गोयल ईडीच्या कार्यालयात चौकशीसाठी हजर झाले आहेत.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.