राणा जगजितसिंह पाटील यांच्यासह 18 जणांवर खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा

अकलूज पोलिसांत फिर्याद दाखल

अकलूज – पंचायत समितीच्या सदस्यांना घरात लपवून ठेवल्याच्या कारणावरून पिस्तूल डोक्‍याला लावून जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी आमदार राणा जगजितसिंह पाटील यांच्यासह 18 जणांवर अकलूज पोलिसांत खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी या प्रकरणात तिघांना ताब्यात घेतले असुन आमदारासह आणखी 15 जण फरारी असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

तुळजापूरचे भाजपचे आमदार राणाजगजितसिंह पाटील यांच्या गटाचे कळंब येथील पंचायत समितीचे 3 सदस्य शिवसेनेने पळवले असल्याची महिती त्यांना मिळाली होती. त्यानुसार पाटील यांचे सदस्य बोरगाव-माळेवाडी (ता. माळशिरस) येथे हिंमतराव पाटील यांच्या बंगल्यावर असल्याचे समजल्यावर राणा जगजितसिंह पाटील आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी रविवारी पहाटे बोरगाव माळेवाडी येथे पोहचले असता तिथे शिवसेनेचे कार्यकर्ते आणि राणा पाटील यांच्या समर्थकांमध्ये बाचाबाची झाली. त्याचे रूपांतर मारहाणीत झाले, त्यावेळी राणा पाटील यांनी पिस्तूल रोखून हिंमतराव पाटील यांना जीवे मारण्याचा व धमकावण्याचा प्रयत्न केला असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.