दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेता आणि “बाहुबली’ फेम राणा दग्गुबती आपल्या आगामी चित्रपटाची जोरदार तयारी करत आहे. बाहुबलीमध्ये राणा दग्गुबतीने त्याच्या “भल्लालदेव’ या पावरफुल्ल भूमिकेने प्रेक्षकांना भूरळ घातली. त्यानंतर आता तो “हाथी मेरे साथी’मध्ये एका नव्या रूपात पाहायला मिळणार आहे. यासाठी राणाने तब्बल 30 किलो वजन कमी केले आहे.
एका मुलाखतीत राणा दग्गुबतीने कशाप्रकारे 30 किलो वजन कमी केले याची माहिती दिली. तो म्हणाला, हा चित्रपट खरा वाटावा, अशी प्रभू सरांची इच्छा होती. बारीक दिसण्यासाठी मी फिजीकल ट्रेनिंग घेतली, सोबतच मला माझं डाएटही बदलावे लागले, असे राणाने सांगितले.
दरम्यान, “हाथी मेरे साथी’मध्ये राणा दग्गुबती हा पांढरे केस आणि दाढी असलेल्या लूकमध्ये झळकणार आहे. हा चित्रपट पुढील महिन्यात प्रदर्शित होणार आहे. हा चित्रपट हिंदी, कन्नड, तमिळ आणि तेलुगू या चार भाषांमध्ये प्रदर्शित होणार आहे. यात राणासह अभिनेता पुलकीत सम्राटही मुख्य भूमिकेत असेल. याशिवाय अभिनेत्री जोया हुसैन आणि मराठमोळी श्रेया पिळगावकरही झळकणार आहेत.