राणा दग्गुबतीबरोबर अफेअर नाही- रकुल प्रीत सिंह

बहुतेकवेळा बॉलिवूड सेलिब्रिटी आपल्या लव्ह लाईफबाबत उघडपणे बोलणे टाळतात. पण फारच कमी वेळेला कोणी ऍक्‍टर आपल्या अफेअरबाबत उघडपणे बोलण्यास तयार होतात. रकुल प्रीत सिंहनेही आपल्या अफेअरबाबत एक स्पष्टिकरण दिले आहे. आपल्याला आपल्या कामावर लक्ष केंद्रीत करायल अधिक आवडते. त्यामुळे प्रेमात पडण्याइतका वेळच आपल्याकडे नसल्याचे ती म्हणाली.

राणा दग्गुबत्तीबरोबर आपले काहीही अफेअर नाही. पण हे अफेअर असल्याचे का बोलले जाते आहे, हे आपल्याला समजत नसल्याचे ती म्हणाली. लोकांबरोबर फ्लर्टिंग करण्यापेक्षा मैत्री करायला तिला जास्त आवडते. फ्लर्टिंग करायला आपण खूप घाबरत असल्याचेही तिने सांगितले.

जर बॉलिवूडमधील एखाद्या ऍक्‍टरबरोबर डेटसाठी जायचे असल्यास आवडेल का, असे विचारल्यावर तिने आनंदाने होकार दिला. डेटसाठी जाण्यासाठी एखाद्या व्यक्‍तीचे प्रोफेशनल स्टेटस महत्वाचे नाही, केवळ तो कसा आहे, हेच महत्वाचे असते असे ती म्हणाली.

राणा दग्गुबत्ती हा आपला शेजारी आहे आणि खूप चांगल्या मित्रांच्या ग्रुपमध्ये आहे. त्यामुळे त्याच्याबरोबर अफेअर नक्कीच नाही, असे ती म्हणाली. सध्या ती “मरजवां’वर लक्ष केंद्रीत करून आहे.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)