मुंबई – खासदार नवनीत राणा आणि त्याचे पती आमदार रवी राणा यांच्यात आणि शिवसेनेत सुरू असलेली शाब्दिक जुगलबंदी थांबण्याचं नाव घेत नाहीये. नवनीत राणा यांनी केंद्र सरकारकडे आणि लोकसभा अध्यक्षांकडे ठाकरे सरकारची तक्रार केल्यानंतर शिवसेनेने त्यांच्यावर कठोर शब्दांत टीका केली आहे. तर यावरूनच काँग्रेसचे प्रवक्ते ॲड. दिलीप एडतकर यांनी सुद्धा टीव्ही ९ या वृत्तवाहिन्यांशी बोलतांना राणा दाम्पत्य भाजप नावाच्या झोमॅटो कंपनीचे डीलिव्हरी कपल असल्याचे म्हणत जहरी टीका केली आहे.
काँग्रेसचे प्रवक्ते ॲड. दिलीप एडतकर माध्यमांशी बोलतांना म्हणाले,’भाजप आणि राष्ट्रवादी अशा दोन होड्यांमध्ये राणा दाम्पत्य स्वार आहेत. खोटे प्रमाणपत्र खरे ठरवण्यासाठी भाजप पक्षामध्ये आहे तर आगामी लोकसभा निवडणुकीच्या तिकीटासाठी राष्ट्रवादी, असा दुहेरी डाव हे नौटंकी जोडपे खेळत आहे असा आरोप एडतकर यांनी माध्यमांशी बोलतांना केला आहे.
ते पुढे म्हणाले,’राणा दाम्पत्याने भाजपची नोकरी स्वीकारली असून, सध्या ते रोजंदारीवर आहेत. राणा दाम्पत्य भाजप नावाच्या झोमॅटो कंपनीचे डीलिव्हरी कपल आहेत.’ असं म्हणत एडतकर यांनी खोचक टीका केली आहे.