भाजपा नेत्यांना भेटल्याबद्दल बसपा आमदाराची पक्षातून हकालपट्टी

लखनौ -लोकसभा निवडणुकीच्या एक्‍झिट पोलच्या अंदाजानंतर बसपाने एका आमदारावर निलंबनाची कारवाई केली आहे. बसपाचे माजी मंत्री व आमदार रामवीर उपाध्याय यांनी एक्‍झिट पोलनंतर भाजपचे उमेदवार एस. पी. सिंह बघेल यांची भेट घेऊन त्यांना शुभेच्छा दिल्या. उपाध्याय आणि बघेल यांच्या गळाभेटीचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाल्यांनंतर पक्षाने त्यांची हकालपट्टी केली.

लोकसभा निवडणुकीबाबत वेगवेगळ्या न्यूज चॅनल आणि संस्थांचे एक्‍झिट पोल जाहीर झाले आहेत. मात्र या एक्‍झिट पोलच्या अंदाजानंतर बसपा अध्यक्ष मायावती यांनी पक्षातील ज्येष्ठ नेते माजी मंत्री व आमदार रामवीर उपाध्याय यांना पक्षातून बाहेरचा रस्ता दाखवला आहे. उपाध्याय यांच्यावर पक्ष विरोधी कारवाई केल्याचा आरोप करून त्यांची हकलपट्टी करण्यात आली आहे. बसपाचे महासचिव मेवालाल गौतम यांनी उपाध्याय यांना निलंबनाबाबत पत्र पाठवले आहे.

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.