रामविलास पासवान यांनी घेतली राज्यसभा सदस्य म्हणून शपथ

नवी दिल्ली- केंद्रीय मंत्री आणि लोक जनशक्ती पक्षाचे (लोजप) अध्यक्ष रामविलास पासवान यांनी आज राज्यसभा सदस्याची शपथ घेतली. बिहारमधून राज्यसभेवर निवडून द्यावयाच्या रिक्त जागेसाठी पासवान यांची बिनविरोध निवड झाली होती. केंद्रीय मंत्री आणि भाजप नेते रविशंकर प्रसाद यांनी लोकसभा निवडणुकीत विजयी झाल्याने राज्यसभा सदस्यत्वाचा राजीनामा दिला.

त्यामुळे या जागेसाठी भाजपच्या नेतृत्वाखालील एनडीएने पासवान यांना उमेदवारी दिली होती. दरम्यान, भाजपच्या नवर्निवाचित खासदार अश्‍विनी बैष्णब यांनीही आज सदस्यत्वाची शपथ घेतली.

Leave A Reply

Your email address will not be published.