फलटणच्या पाण्याचा प्रश्‍न रामराजेंनीच सोडवला – आ. चव्हाण

कापडगाव येथे विविध विकासकामांचे उद्‌घाटन
लोणंद – फलटण तालुक्‍याचा पाण्याचा प्रश्‍न विधान परिषदेचे सभापती ना. रामराजे नाईक निंबाळकर यांनीच सोडवल्याचा पुनरुच्चार आमदार दीपक चव्हाण यांनी केला.

कापडगाव, ता. फलटण येथे आ. दीपक चव्हाण यांच्या हस्ते विविध विकासकामांचे उद्‌घाटन करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते. तालुक्‍यातील उर्वरित दुष्काळग्रस्त भागातील पाणी समस्याही रामराजेच सोडवतील. आगामी काळात कार्यकर्त्यांनी रामराजेंच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहण्याची आवश्‍यकता आहे. रामराजे जो निर्णय घेतील तो तालुक्‍याच्या हितासाठीच असेल, असे आ. चव्हाण म्हणाले.

कापडगाव येथील सरदेच्या ओढ्यावरील पूल, सईबाई हौसिंग सोसायटी-कापडगाव रस्ता व दलित वस्ती सुधार योजनेत अंतर्गत रस्त्याचे भूमिपूजन करण्यात आले. माजी सभापती वसंतराव गायकवाड व जिल्हा परिषद सदस्य दत्ता अनपट यांनी मनोगत व्यक्‍त केले. माजी सरपंच प्रवीण खताळ यांनी प्रास्ताविक करून आभार मानले.

पंचायत समितीच्या सभापती प्रतिभा धुमाळ, सुभाषराव गायकवाड, सरपंच हेमंत कचरे, उपसरपंच शोभा करे, माजी सरपंच वैभव खताळ, संजय करे, हिंदुराव करे, शरद खताळ, राजेंद्र केसकर, सूरज गेजगे, बाजीराव खताळ, दत्ता मलगुंडे, चंद्रकांत खताळ, किसन मलगुंडे, पप्पू करे, भास्कर गेजगे, हणमंत खताळ, विठ्ठल खताळ, अमित खताळ, संतोष काकडे, हिंदुराव खताळ, सुनील जाधव, प्रकाश जाधव, महेंद्र गायकवाड, अमोल गायकवाड, सचिन गायकवाड, अविनाश गायकवाड, दिलीप काकडे, अनिल गेजगे, बापूराव काकडे, शिवाजी गेजगे, दीपक साळुंखे, महेश मदने, हिरालाल मदने, कांतिलाल कुंभार, बापूराव धुरगुडे, अरुण खोमणे उपस्थित होते.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.