रामपूर (उत्तर प्रदेश) : मला चार सामोसे पाठवून द्या, सोबत चटणीही हवी… ही मागणी केलीय ती कोणत्या हलवायाच्या दुकानात नव्हे तर कोरोनाच्या माहितीसाठी जिल्हाधिकाऱ्यांनी सुरू केलेल्या हेल्पलाईनवर… त्या तरूणाला चार वेळा समजावून सांगितले… बाबारे त्रास देऊ नकोस… ही वेळ नव्हे पण ऐकेल तर…
4 समोसा भिजवा दो… चेतावनी के बाद आखिर भिजवाना ही पड़ा।
अनावश्यक मांग कर कंट्रोल रूम को परेशान करने वाले व्यक्ति से सामाजिक कार्य के तहत् नाली सफाई का कार्य कराया गया। pic.twitter.com/88aFRxZpt2— DM Rampur (@DeoRampur) March 29, 2020
हा संतापजनक प्रकार घडला रामपूर येथे. देश लॉकडाऊनमुळे अनेक समस्यांना सामोरे जातोय हे खरंय. पण म्हणून जिल्हाधिकाऱ्यांच्या नियंत्रण कक्षाशी अशी गंमत करायची?… त्याला चार वेळा फोनवर समजावून सांगितले, ही गंमत करायची वेळ नाही. गंभीर समस्येला आपण सामोरे जात आहोत पण हा पठ्ठ्या काय ऐकायला तयार नाही. ही बाब जिल्हाधिकाऱ्यांना समजली. त्यांनी या तरूणाला धडा शिकवायचा ठरवलं.
त्यांनी अधिकाऱ्यांना पाठवून त्या तरूणाला चटणीसह चार सामोसे पाठवून दिले. आणि नंतर… अधिकाऱ्यांना त्रास दिल्याबद्दल त्याल त्याच्या भागातील गटार साफ करायला लावली. हा भाग जिल्हाधिकाऱ्यांनी त्यांच्या ट्विटरवर हा व्हिडिओ शेअर केला आहे.