3 इडियट्स मधील रियल ‘फुंसुख वांगड़ू: सोनम वांगचुक 

रॅमन मॅगसेस पुरस्कार विजेत्यामधील दुसरे भारतीय म्हणजे सोनम वांगचुक. वांगचुक यांच्या कर्तृत्वाची ओळख करून घ्यायची तर “3 इडिएट’मध्ये आमिर खानने साकारलेल्या फुनसुख वांगडूचा रोल आठवून पहा. राजकुमार हिरानीला या रोल वांगचुक यांच्यावरूनच सुचला असावा, असे म्हणता येईल.
पुस्तकी शिक्षणावर अवलंबून न राहता आपल्या डोक्‍यातील कल्पना साकारण्यासाठी प्रत्यक्ष प्रयोगाचा आधार घेणाऱ्या वांगचुक यांनी शिक्षणाचा केंद्रबिंदू शाळेपासून हलवून प्रत्यक्ष फिल्डवर फोकस केला. जम्मू काश्‍मीरमधील लेह जिल्ह्यातील उलेटोक्‍पो इथे 1966 साली जन्मलेल्या वांगचुक यांना घरातूनच राजकारणाचे बाळकडू मिळाले. वडील सोनम वांगयाल हे राज्याच्या राजकारणात सक्रिय होते. त्यांच्या मातृभाषेमधील एकही शाळा अस्तित्वात नसल्याने सोनम वांगचुक यांना त्यांच्या आईनेच 9व्या वर्षापर्यंत सर्व शिक्षण घरीच दिले.
पुढे श्रीनगरच्या शाळेमध्ये वांगचुक यांचे नाव घातले गेले. मात्र तेथे भाषेचा प्रश्‍न निर्माण झाल्याने त्यांचे शालेय शिक्षण रखडले. तेथून दिल्लीच्या शाळेत नाव घातल्यावरही शिक्षणाची लडाखी भाषा नसल्याने वांगचुक यांच्याप्रमाणे लडाखचे विद्यार्थी मागे पडत असत. त्यातूनही त्यांनी जिद्दीने बी.टेक. पर्यंतचे शिक्षण केले होते. तेथून फ्रान्सला जाऊन त्यांनी आर्किटेक्‍चरचे उच्च शिक्षण घेतले. तेथून परत आल्यावर वांगचुक आणि त्यांच्या भावाने लडाखमध्ये “स्टुडंटस एज्युकेशन ऍन्ड कल्चरल मुव्हमेंट इन लडाख’नावाने शिक्षण संस्था सुरू केली.
लडाखमधील शिक्षण व्यवस्था सुधारणे हा या संस्थेचा प्रमुख हेतू होता. याच अंतर्गत त्यांनी 1994 मध्ये “ऑपरेशन न्यू होप’ नावाची संस्था सुरू केली. लडाख, सिक्कीम आणि नेपाळ मधील शाळांसाठी सौरउर्जेचा वापर होणाऱ्या इमारती त्यांनी उभ्या केल्या. सौर उर्जेमुळे कायम थंदी असलेल्या या शाळांमध्ये उबदार वातावरण रहाते. 2005 साली केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालयाच्या प्राथमिक शिक्षणासाठीच्या संचालक मंडळावर वांगचुक यांची नियुक्‍ती झाली.
बर्फाचे पाणी साठवून त्याचा उन्हाळ्यात उपयोग करण्याचे “आईस स्तूप’ तंत्र त्यांनी विकसित केले. हे पाणी शेतकऱ्यांना उन्हाळ्यात उपयोगी येते. अशा तऱ्हेच्या “फार्म स्टे लडाख’ या वैज्ञानिक तत्वांचा त्यांनी दैनंदिन जीवनात उपयोग करण्याची अनेक तंत्रे विकसित केले.
महाविद्यालये आणि विद्यापिठांमधील शिक्षण कालबाह्य झाले आहे. त्याऐवजी प्रत्यक्ष जीवनात उपयोगी होईल असेच शिक्षण विद्यार्थ्यांना द्यायला हवे, असा आग्रह वांगचुक गेल्या कित्येक वर्षांपासून धरत आहेत. या शिक्षणाचा उपयोग दैनंदिन जीवनामध्ये कसा करायचा, याचे ज्ञान विद्यार्थ्यांना स्वतःहून उपजत यायला हवे, यासाठी ही शिक्षण व्यवस्थाच समूळ बदलून टाकण्याच्या इराद्याने त्यांनी सुरू केलेल्या कामाची दखल रॅमन मेगासेसे पुरस्कारामुळे सर्व देशाला घ्यावी लागली आहे. राजकुमार हिरानी यांच्या “3 इडिएट’मध्ये फुनसुख वांगडूची व्यक्‍तीरेखेची कल्पना वांगचुक यांच्यावरच बेतलेली. पण वांगचुक नेहमीच ते श्रेय नाकारत राहिले.
-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)